हट्टंगडी, सीताराम आर.
सीताराम आर. हट्टंगडी यांनी मद्रास येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातून पशुवैद्यकीय पदवी प्राप्त केली. त्यांनी लंडन येथील रॉयल पशुवैद्यकीय महाविद्यालयातून शल्यक्रिया तंत्रज्ञान आत्मसात केले. त्यांची मुंबई येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून १९६८मध्ये नेमणूक झाली. एक निष्णात पशु-शल्यचिकित्सक म्हणून ते ओळखले जात. ते मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता म्हणून काम करत असताना १ जून १९६८ रोजी सदर महाविद्यालय विद्यापीठ, राहुरी येथील महाराष्ट्र कृषी विद्यापीठाशी संलग्न करण्यात आले.
- संपादित
हट्टंगडी, सीताराम आर.