Skip to main content
x

खाडिलकर, त्र्यंबक रामचंद्र

महाराज खाडिलकर

          त्र्यंबक रामचंद्र खाडिलकर यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बाणापूर या गावी झाला. त्यांचे बालपण मध्यमवर्गीय कौटुंबिक वातावरणात गेले. त्यांचे वडील नोकरी करत होते. लहानपणीच त्यांच्यावर घरकामाची जबाबदारी  पडली. ते १९०९मध्ये मॅट्रिक उत्तीर्ण झाले. त्यांच्या वडिलांनी नोकरीसाठी प्रयत्न करण्याचा आग्रह धरला, पण त्यांना उच्च शिक्षण घ्यावयाचे होते.

          त्यांनी पुण्यातील कृषी महाविद्यालयात प्रयत्न करून प्रवेश मिळवला. आत्याबाईंनी शुल्काची व्यवस्था करून दिली. खाडिलकर यांची आर्थिक परिस्थिती फारच बिकट असल्यामुळे ते पाठ्यपुस्तके घेऊ शकले नाहीत. त्यांनी  वाचनालयामध्ये जाऊनच अभ्यास केला व खूप कष्टाने आणि जिद्दीने बी.एस्सी. (कृषी) पदवी प्राप्त केली. नंतर त्यांनी तेथील महाविद्यालयामध्ये अध्यापक म्हणून नोकरीला सुरुवात केली. 

          कापूस संशोधनाचे काम करत असतानाच खाडिलकर यांचे कौशल्य पाहून त्यांना मुंबई शासनातर्फे १२ जुलै १९३१ रोजी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्यात आले. तेव्हा तेथे त्यांनी दोन वर्षांचा एम.एस.चा अभ्यासक्रम १ वर्ष दोन महिन्यांतच पूर्ण केला व एम.एस.ची पदवी प्राप्त केली.

          अमेरिकेतील शिक्षण ९ सप्टेंबर १९३२ रोजी पूर्ण करून खाडिलकर भारतात परतले आणि त्यांनी कापूस संशोधनामध्ये नवीन जात विरनार (एन आर द जरीला या दोन जातींचा संकर करून) शोधून काढली व ती शेतकर्‍यांना उपयोगी पडली. खाडिलकर यांना मधुमेहाचा त्रास होता. त्यांचे महाशिवरात्रीच्या दिवशी निधन झाले.

 - प्रा. पद्माकर दत्तात्रय वांगीकर

खाडिलकर, त्र्यंबक रामचंद्र