Skip to main content
x

हेरास,  हेन्री

     स्पेनमध्ये हेन्री हेरास यांचे शिक्षण झाल्यावर हिंदुस्थानच्या इतिहासाचे प्राध्यापक म्हणून ते मुंबईच्या सेंट झेवियर कॉलेजमध्ये आले. इंडियन हिस्टॉरिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे ते डायरेक्टरही होते. हेन्री हेरास यांना दक्षिण हिंदुस्थानच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकणारे अनेक संशोधनात्मक लेख लिहिण्याचा व वस्तू वगैरे जमा करण्याचा नाद होता व त्यांनी अफगाणिस्थान वगैरे भागातून अनेक वस्तू संग्रहित केल्या होत्या.

     हेन्री हेरास यांच्या मताप्रमाणे द्रविड संस्कृती अत्यंत प्राचीन पण सुधारणेच्या शिखराला पोहोचलेली होती, तर आर्य हे मागासलेले रानटी होते. हेन्री हेरास यांचा सर्वात महत्त्वाचा शोध म्हणजे मोहेंजोदाडो येथील उत्खननात सापडलेल्या लिपीचा उलगडा करून हेन्री हेरास यांनी तिचे वाचन केले, हा होय. हेन्री हेरास यांचे इंग्रजी ग्रंथ- १. हिस्टरी ऑफ मांचू डायनॅस्टी ऑफ चायना (३ व्हा.) २. दि अरविदु डायनॅस्टी ३. दि रायटिंग ऑफ हिस्टरी वगैरे. याशिवाय त्यांनी स्पॅनिश भाषेतही लेखन केले होते.

संपादित

संदर्भ
अर्वाचीन चरित्रकोश; संपादक, चित्राव सिद्धेश्‍वरशास्त्री
हेरास,  हेन्री