Skip to main content
x

भडकमकर, आनंद वामन

     नंद भडकमकर यांचा जन्म व शिक्षण नागपूर येथे झाले. नंतर शॉट सर्व्हिस कमिशनद्वारा त्यांनी सेनादलात प्रवेश केला व तेथील कार्यकाळ संपल्यानंतर भारतीय प्रशासन सेवेमध्ये (महाराष्ट्र केडर) प्रवेश केला. त्यांनी पुणे व नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुण्याचे जिल्हाधिकारी, मराठवाडा विकास महामंडळाचे व्यवस्थापक संचालक इ. पदांवर असताना लक्षणीय कार्यकौशल्य दाखविले. तसेच त्यांनी टेक्सकॉम व गोदावरी गारमेण्टस् इ. उप कंपन्यांची स्थापना करून मराठवाड्यात वस्त्रोद्योग रुजविण्याचे कार्य केले. महाराष्ट्र राज्याचे दिल्ली येथील विशेष आयुक्त, सिकॉमचे व्यवस्थापकीय संचालक, राज्याचे उद्योग आयुक्त व सचिव इ. पदांवर काम करताना राज्यात औद्योगिक गुंतवणूक आकृष्ट करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले व त्यात चांगले यश मिळवले. राज्याचे नियोजन सचिव पदावर कार्यरत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे मुंबईत आकस्मिक निधन झाले. त्यांचे चाहते व मित्र परिवाराने “कै.आनंद भडकमकर मेमोरियल ट्रस्ट’ ही संस्था स्थापन केली असून या संस्थेच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक कार्य केले  जात आहे.

- प्रभाकर करंदीकर

भडकमकर, आनंद वामन