Skip to main content
x

भणगे, श्रीनिवास जगन्नाथ

श्रीनिवास जगन्नाथ भणगे यांचा जन्म कर्जत (जि. अहमदनगर) येथे झाला. शिक्षण अहमदनगर येथे झाले. अहमदनगर महाविद्यालयातून १९६०मध्ये भणगे यांनी पदवी मिळवली. काही वर्षे बँकेत नोकरी केल्यावर त्यांनी पूर्ण वेळ लेखनास वाहून घेतले.

त्यांचे प्रारंभीचे लेखन तत्कालीन लोकप्रिय मासिकांतून प्रसिद्ध झाले. कथा-कादंबर्‍यांपेक्षा त्यांचा कल नाट्यलेखनाकडे अधिक आहे. सुरुवातीला त्यांनी ‘चोरावर मोर (१९६५), ‘हातोहात’ (१९६८) आदी एकांकिका लिहिल्या. त्यानंतर व्यावसायिक रंगभूमीवर यशस्वी ठरलेली ‘अरे अश्वत्थामा’ (१९७१), ‘शांतेचं कार्टं चालू आहे’ (१९७१), ‘मॅडम’ (१९८२), ‘आकाशाशी जडले नाते’ (१९८२) आदी नाटके लिहिली. ‘मुखवटे आणि चेहरे’ (१९७५), ‘समान्तर’ (१९७१) अशा काही कादंबर्‍या आणि काही बालनाट्ये त्यांच्या नावावर जमा आहेत

- संपादक मंडळ

 

 

भणगे, श्रीनिवास जगन्नाथ