Skip to main content
x

कानडे, मुकुंद श्रीनिवास

     मुकुंद श्रीनिवास कानडे यांनी संतसाहित्य, वाङ्मयीन समीक्षा, नाट्यविषयक अशा विविध क्षेत्रांत विपुल कार्य केले. त्याचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. संतसाहित्याचे गाढे अभ्यासक, भाषाशास्त्राचे ज्येष्ठ अध्यापक, विविध ग्रंथांचे मार्मिक मीमांसाकार, नाट्य वाङ्मयाचे व्यासंगी संकलक, नाट्यसंगीताचे मर्मज्ञ रसिक, इतिहासविषयक बखरींचे संशोधक, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख आणि पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू होते. संतसाहित्याचा अभ्यास करून त्यांनी या क्षेत्रात अभूतपूर्व काम करून ठेवले आहे. त्यातूनच संतसाहित्य संदर्भकोश’ (१९९५), ‘संताचे हे भेटी’, ‘संत नामदेव काव्यदर्शन’ (२००१), ‘ग्रंथराज दासबोध शब्दार्थ संदर्भकोश’ (२००३) असे महान ग्रंथ निर्माण झाले. पुढच्या काळात ‘ज्ञानेश्वरी टिपण’, ‘ज्ञानदेवांची सार्थ चिकित्सक गाथा’, ‘ज्ञानदेवांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यासहे ज्ञानदेवविषयक ग्रंथ गाजले. तसेच संत नामदेवांचा सार्थ चिकित्सक गाथा’, ‘नामदेव गाथा - शब्दार्थ कोश’, असे संत नामदेवांवर काम करून संत नामदेवांचा सार्थचिकित्सक गाथा’, ‘नामदेव गाथा शब्दार्थ संदर्भकोशआपल्या सहकाऱ्यांच्या साहाय्याने तसेच एकनाथी भागवताचा संदर्भ कोश’, ‘चोखामेळ्याची अभंगवाणी’, ‘समर्थ रामदास वाङ्मय शब्दार्थ कोशअसे अभ्यासकांना मार्गदर्शनपर ; विविध संतांविषयी साहित्यग्रंथ त्यांनी लिहिले.

संतसाहित्याबरोबर कानडे यांना मराठी नाटकांचेही वेड होते. .. १८८० ते २००५ या १२५ वर्षांच्या काळातील मराठी रंगभूमीची प्रयोगक्षम नाटके, नाटककारांच्या जन्म-मृत्यूच्या नोंदी, विविध नाट्यप्रयोगांसंबंधी, त्यांच्या संगीताच्या लोकप्रियतेसंबंधी अनेक नोंदीप्रयोगक्षम नाटके’ (१९६२) आणि मराठी रंगभूमीचा उष:काल’ (१९६८) या दोन ग्रंथांतून आढळतात.

कालचे नाटककारया ग्रंथात आजच्या नाटकवेड्या पिढीलासुद्धा अपरिचित असलेले वीर वामनराव जोशी, वासुदेवशास्त्री खरे, माधवराव पाटणकर, वासुदेवराव शिरवळकर यांच्या नाटकांचा परामर्श घेत त्या त्या नाटककारांची ओळख  त्यांनी करून दिली आहे. मराठी नाटकावर त्यांची सहा अभ्यासपूर्ण पुस्तके वेळोवेळी प्रसिद्ध झाली आहेत. प्रयोगक्षम मराठी नाटके (१९६२)’, ‘कालचे नाटककार (१९६७)’, ‘मराठी रंगभूमीचा उष:काल’ (१९६८), ‘नाट्यशोध’ (१९८७), ‘मराठी रंगभूमीची १२५ वर्षेआणि मराठी नाट्य परिषद इतिहास आणि कार्यहे सर्व अभ्यासपूर्ण लेखन  त्यांनी; कै. डॉ. रा.शं. वाळिंबे यांची मराठी विभाग प्रमुखाची गादी चालवत असताना केले, तेही विद्यार्थिप्रिय प्राध्यापक बिरुद लावून.

वा.. मंजूळ

कानडे, मुकुंद श्रीनिवास