मॅक्सम्यूलर फ्रेडरिक विल्हेम
फ्रेडरिक मॅक्स म्यूलर हे सुप्रसिद्ध जर्मन कवी विल्हेम म्यूलर यांचे पुत्र. लिपझिग युनिव्हर्सिटीमधून बी.ए. झाल्यानंतर त्यांनी पॅरिस युनिव्हर्सिटीत बर्नाफ, बॉप, स्केलिंग विख्यात पंडितांजवळ संस्कृत भाषेचा विशेष अभ्यास केला, व ते १८४८मध्ये ऑक्स्फर्डला आले. तेथे प्रथम युरोपीय भाषांचे व नंतर तौलनिक भाषाशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केल्यावर ते सेवानिवृत्त झाले. ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटीत संस्कृत भाषेचे प्राध्यापक होण्याची त्यांची इच्छा मात्र अपूर्णच राहिली.
तौलनिक भाषाशास्त्राचे अध्ययन करीत असता संस्कृत भाषेचे विशेष महत्त्व त्यांच्या ध्यानी आले. अनेक प्रकारच्या क्रान्त्यांमध्ये संस्कृतचे भारतीय महत्त्व कायमच राहिले, याचे त्यांना कौतुक वाटले व वेदांच्या अध्ययनानंतर तर ते संस्कृतचे अभिमानी बनले.
तौलनिक धर्मशास्त्राच्या अध्ययनातही वैदिक धर्माचे श्रेष्ठत्व त्यांच्या ध्यानात आले. निरनिराळ्या धर्मांचा अभ्यास करीत असता राष्ट्राच्या जीवनात एकरूप झालेला दुसरा धर्म त्यांना आढळला नाही. विवाहापासून प्रत्येक गोष्ट वेदाला धरून करण्याची पद्धत त्यांना अगदी नवी वाटली. भक्त, पंडित व भिकारी या सर्वांच्या जीवनावर सारख्याच प्रकारे दिसणारी वैदिक धर्माची छाप त्यांना नमुनेदार आढळली. देव — न्यायाधीश आणि मनुष्य — अपराधी या ख्रिस्ती कल्पनेपेक्षा प्रत्येकाला कर्मानुसार गती मिळते, ईश्वरालासुद्धा त्यात बदल करता येत नाही हा वैदिक सिद्धान्त त्यांना नमुनेदार वाटला.
यामुळे हिंदुस्थान, तेथील लोक व संस्कृती याबद्दल त्यांच्या मनात अत्यंत आपलेपणा उत्पन्न झाला. तिकडे भेटणार्या हिंदी लोकांची ते मनापासून वास्तपुस्त करीत. इतकेच नव्हे, तर हिंदुस्थानात पुनर्जन्म घेण्याची कल्पनाही हे अनेक वेळेला बोलून दाखवत. लो. टिळकांसारख्या वैदिक पंडिताला राजद्रोहाच्या आरोपावरून शिक्षा झाली, तेव्हा त्यांच्या शिक्षेची मुदत भरण्यापूर्वी त्यांना सोडवण्याच्या कामात मूलर यांनी पुढाकार घेतला. स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या हिंदुस्थानच्या प्रेमाबद्दलच्या आठवणी लिहिल्या असून प्राचीन ऋषिमुनींची आठवण करून देणारे यांचे व्यक्तित्व असल्याची कबुली दिली आहे. स्वामी विवेकानंदांनीच पुरवलेल्या माहितीचा उपयोग करून म्यूलर यांनी ठरारज्ञीळीहरि, हळी ङळषश रवि डरूळसिी हा आपला सुप्रसिद्ध ग्रंथ लिहिला.
म्यूलर यांचे कामही मोठे पद्धतशीर असे. ऋग्वेदाची आवृत्ती काढण्यापूर्वी यांनी ऋक्प्रातिशाख्याचा सूक्ष्म अभ्यास करून त्यांचे जर्मन भाषेत भाषांतर केले, आणि त्याची भरपूर चिकित्सा केली. ऋग्वेदाची सायणभाष्यासह चिकित्सक आवृत्ती काढण्याकरिता त्यांनी अत्यंत मेहनत घेतली व त्या प्रतीवर ‘ऋग्वेदसंहिता - शार्मण्यदेशोत्पन्नेनेग्लण्ड देश निवासिना मोक्षमूलरभट्टेन संशोधिता गोतीर्थाभिधाने नगरे’ असे संस्कृतमध्ये लिहिले. यातील शार्मण्य = जर्मन, स्वत:च्या नावाला लावलेले भट्ट व ऑक्स्फर्ड = गोतीर्थ हे ध्यानात घेण्यासारखे आहे.
ऋग्वेद प्रकाशनाकरिता त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी व विजयनगरचे महाराज यांच्याकडून आर्थिक साहाय्य मिळवले होते. त्यांच्या वेळेपर्यंत जर्मनीत जर्मन भाषेत वेदार्दिवाङ्मयाचा पुष्कळ पद्धतशीर अभ्यास झाला होता. त्यामुळे आणि म्यूलर यांच्या लोकप्रिय इंग्रजी भाषेमुळे त्यांच्याकडे जगाचे लक्ष वेधले व वेदार्दिवाङ्मयाची जगाला गोडी लावण्याचा मान म्यूलर यांना मिळाला.
त्यांचे ग्रंथ - भाषाशास्त्र : (१) ढहश डलळशलिश षि ङरर्सिीरसश, (२) ङरीीं एीीरूी (पहिला खंड), (३) ढहश डळश्रशीळरि किीीशहशीव (भाषा व विचार यांचे संबंध) इत्यादी.
धर्मशास्त्र : (१) जीळसळि रवि ॠीिुींह षि ठशश्रळसळिि, (२) खिीींर्विीलींळिि ीिं ींहश डलळशलिश षि ठशश्रळसळिि, (३) छर्रीीींरश्र ठशश्रळसळिि, (४) झहूीळलरश्र ठशश्रळसळिि, (५) अिींहीििश्रिसिळलरश्र ठशश्रळसळिि, (६) झीूलहश्रिसिळलरश्र ठशश्रळसळिि इत्यादी.
हिंदुस्थानसंबंधी : (१) कळीीिीूं षि अलिळशिीं डरिीज्ञीळीं ङळींशीर्रीीींश, (२) खविळर, थहरीं लरि ीहश ींशरलह र्ीी, (३) ढहीशश ङशर्लीीींशी िि तशवरिींर, (४) ढहश डळु डूीींशाी षि खविळरि झहळश्रिीिहिू इत्यादी.
इतर : (१) चू र्ईींलिळसिीरहिू, (२) ऊर्शीीींलहश ङळशलश (जर्मन प्रेम, आत्मचरित्रपर), (३) उहळिी षीिा र ॠशीारि थिीज्ञीहिि, (४) र्ईश्रव ङरसि डूशि (तीन खंड), (५) ढहश डलळशलिश षि ढर्हिीसहीं, (६) ढहश डलळशलिश षि चूींहश्रिसिू इत्यादी.
संपादन : डरलीशव इिज्ञिी षि ींहश एरीीं (५१ खंड).
- संपादित