Skip to main content
x

पटवर्धन, आनंद अच्युत

        आनंद पटवर्धन यांचा जन्म मुंबई येथे झाला. परंतु ते मूळचे अहमदनगरचे होते. १९७० मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची इंग्रजी साहित्य या विषयात बी.ए.ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर १९७० मध्ये आनंद पटवर्धन यांनी ब्रंडीस विद्यापीठातून समाजशास्त्र या विषयात दुसऱ्यांदा बी.ए.ची पदवी मिळवली, तर १९८२ मध्ये त्यांनी संभाषणकौशल्य या विषयातील एम.ए.ची पदवी मॅक गिल विद्यापीठातून प्राप्त केली.

आनंद पटवर्धन यांचे काका रावसाहेब पटवर्धन आणि वडील अच्युतराव पटवर्धन हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील आघाडीच्या फळीत होते. तसेच समाजवादी विचारसरणीचा प्रसार त्यांनी महाराष्ट्रातून केला. तीच विचारसरणी घेऊन आनंद पटवर्धन यांनी अनेक लघुपट निर्माण केले.

आनंद पटवर्धन यांनी प्रिझनर ऑफ कॉनसायन्स’ (१९७८), ‘बिझनेस अ‍ॅज युजवल’, ‘वेव्हस् ऑफ रेव्हुलेशन’ (१९७४), ‘अ टाईम टू राइज’ (१९८१), ‘हमारा शहर’, ‘उन मित्रोंकी याद’, ‘राम के नाम’, ‘द अदर साइज’, ‘वुई आर नॉट युअर मंकीजअसे अनेक लघुपट निर्माण केले आहेत. देशातून आणि परदेशातून त्यांच्या अनेक लघुपटांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.

एक आघाडीचा लघुपट निर्माताम्हणून पटवर्धन यांचे नाव घेतले जाते.

- संपादित

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].