द्रविड, लक्ष्मणशास्त्री
लक्ष्मणशास्त्री द्रविड हे भारतवर्षीय कीर्तीचे, मूळचे तामिळनाडू येथील परंतु काशी येथे राहणारे सुप्रसिद्ध संस्कृत पंडित होते. त्यांनी कलकत्त्यास विश्वविद्यालयांत नोकरी केल्यावर शेवटी ते काशीस राहिले.
ऋग्वेद, कृष्ण यजुर्वेद,वेदान्त,सांख्य, व्याकरण हे त्यांचे अभ्यासाचे विशेष विषय होते. काशी विश्व विद्यालयात रणवीर संस्कृत पाठशाळेत त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले.
ब्राह्मण संमेलन, अखिल भारतीय ब्राह्मण महासंमेलन यांच्या माध्यमातून अलीकडच्या काळात सनातनी विचारसरणीचा पुरस्कार करून धर्मसुधारकांशी दोन हात करण्याचे काम त्यांनी अत्यंत यशस्वीपणे केले. अखिल भारतीय वर्णाश्रम स्वराज्य संघाची स्थापना करून त्यांनी सनातनी पक्षाला संघटित केले, आणि काशीला अखिल भारतीय ब्राह्मण संमेलन भरवून सनातनी विचारसरणीवर हल्ला करणार्यांस आव्हानपूर्वक अंगावर घेऊन, सनातनी विचारसरणी कशी कणखर पायावर उभारलेली आहे हे लोकांच्या निदर्शनास आणले. विवाह-वयोमर्यादा नियंत्रण कायद्याच्या निषेधार्थ त्यांनी नोकरी व पदवी याचा त्याग केला होता. राजेश्वरशास्त्री द्रविड हे त्यांचे चिरंजीव होत.
— संपादित /आर्या जोशी