Skip to main content
x

बर्जेस, जेम्स

     भारतात येऊन संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न करताना, इथली पुरातन स्थापत्ये, शिल्पे, शिलालेख इत्यादींनी अचंबित होऊन आपला वैभवशाली इतिहास शोधून काढण्याचे आणि हा अमूल्य ठेवा लिखित स्वरूपात जतन करून भारतीयांच्या हातात अलगदपणे ठेवण्याचे महान कार्य करणारे एक भारदस्त व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. जेम्स बर्जेस.

      भारतातील  एळिसीरहिू चे (लिपिशास्त्राचे) अभ्यासक, ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ, इतिहासतज्ज्ञ, ईलहरशश्रिसिळलरश्र र्र्डीीींशू षि खविळरची धुरा समर्थपणे सांभाळणारे कुशल संयोजक जेम्स बर्जेस म्हणजे एक उत्तुंग माणूस! इंग्लंडमधील डम्फ्रेशायर येथे जन्मलेल्या बर्जेस यांचे शिक्षण एडिंबर्ग येथे झाले. १८५६ साली भारतात आल्यानंतर कलकत्ता येथील शैक्षणिक कामात ते व्यग्र होते.

     त्यानंतर १८६१मध्ये ब्रिटिश सरकारने मुंबईला त्यांची बदली केली. मुंबईच्या परिसरातील पुरातन वास्तूंकडे आकर्षित होऊन त्यांनी इतिहासाचा आणि स्थापत्यशास्त्राचा अभ्यास सुरू केला, हाच अभ्यास त्यांच्या पुढील आयुष्यातील महान कार्याची पायाभरणी करणारा ठरला. ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’चे सभासद झाल्यानंतर १८६९मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक ढहश ढशाश्रिशी षि डर्रीीींक्षिरू प्रसिद्ध केले आणि लागोपाठच ठलिज्ञ-र्लीीं ढशाश्रिशी षि एश्रशहिरिींर हेसुद्धा प्रसिद्ध केले. इिालरू ॠशसिीरहिळलरश्र डलिळशीूंचे कार्यवाह म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. १८७२ साली ढहश खविळरि अिींर्ळिींरीू हे नियतकालिक त्यांनी सुरू केले. पुढील १३ वर्षे त्यांनी या नियतकालिकाचे संपादकत्व सांभाळले. हे नियतकालिक म्हणजे भारतीय इतिहासाच्या पाऊलखुणांचा शास्त्रोक्त पद्धतीने घेतलेला वेध. बर्जेस यांच्या कामाचा हा झपाटा पाहून १८७३ साली ईलहरशश्रिसिळलरश्र र्र्डीीींशू षि थशीींशीि खविळरच्या प्रमुखपदाची धुरा त्यांच्यावर सोपवण्यात आली.

     तोपर्यंत उत्तर भारतातील ऐतिहासिक वास्तूंच्या अभ्यासावर अधिक भर देण्यात आला होता. उर्वरित भारतातील अनमोल खजिना दुर्लक्षित होता. बर्जेस यांनी अमाप उत्साहाने आणि पद्धतशीरपणे या प्राचीन वास्तूंचा अभ्यास आरंभला आणि फलित म्हणून ठशििीीं िि ींहश अिींर्ळिींळींळशी षि ींहश इशश्रसर्रीा घरश्ररवसळ ऊळीीींळलीीं (१८७४) हा अहवाल प्रसिद्ध झाला. हा आणि या मागोमाग प्रकाशित झालेले सर्वेक्षणाचे अहवाल म्हणजे प्राचीन भारतीय इतिहास आणि स्थापत्यकला यांचे त्यांचे उत्कृष्ट संदर्भग्रंथच बनले. उत्तम प्रतीचा कागद, उत्कृष्ट बांधणी आणि ऐतिहासिक वास्तूंच्या छायाचित्रांसह असणारा माहितीपूर्ण संग्रह ही या अहवालांची वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. १८८१मध्ये दक्षिण भारतातील सर्वेक्षणाची जबाबदारी पार पाडताना तामिळ आणि संस्कृत शिलालेखांच्या अभ्यासावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते.

     पश्‍चिम आणि दक्षिण भारतातील त्यांच्या या घोडदौडीनंतर १८८६मध्ये. संपूर्ण देशाच्याच पुरातत्त्व खात्याची जबाबदारी बर्जेस यांच्या समर्थ हातात सोपवण्यात आली. ईलहरशश्रिसिळलरश्र र्र्डीीींशू षि खविळरच्या प्रमुखपदी असताना त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य घडून आले. संपूर्ण भारतात-विशेषत: दक्षिण भारतात अनेक प्राचीन शिलालेख आणि ताम्रपट लेख सर्वेक्षणातून उपलब्ध झाले होते. त्या सर्व लेखांचे लिप्यंतरण आणि भाषांतर करवून घेऊन त्यांचे पद्धतशीरपणे प्रकाशन करण्याचे श्रेय बर्जेस यांच्याकडे जाते. एळिसीरहिळर खविळलरचा पहिलाच खंड आला तो याकोबी, फ्लीट यांच्यासारख्या विद्वानांच्या वैशिष्ट्यपूर्ण लेखांसह! १८९२ साली सुरू झालेली एळिसीरहिळर खविळलरची परंपरा पुढील १४ वर्षे सातत्याने प्रकाशित करण्याची अत्यंत अवघड कामगिरी बर्जेस यांनी पार पाडली. खरे तर मधल्या काळात ते सरकारी नोकरीतून निवृत्त झाले होते. परंतु तरीही या प्रकाशनांची जबाबदारी त्यांनी उत्साहाने पार पाडली. बर्जेस यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर एळिसीरहिळर खविळलरमधील ऐतिहासिक पुरावे म्हणजे अन्य कुठल्याही देशापेक्षा काकणभर सरस असणारे प्राचीन इतिहासाचे साक्षीदार ठरणारे दस्तऐवज आहेत.’’

     आपल्या पूर्वजांनी स्वत:च्या शब्दात मांडून ठेवलेले लिखित पुरावे उपलब्ध झाल्याने तत्कालीन समाजाचे एक चित्रच आपल्यापुढे उलगडले गेले. या खंडामुळे प्राचीन काळातील भारतीय समाजव्यवस्था, धर्मव्यवस्था, चालीरिती इत्यादीवर प्रकाश पडलाच, त्याचबरोबर प्राचीन भारतातील भौगोलिक संदर्भ, बोलल्या जाणार्‍या विविध भाषा, लेखनाच्या पद्धती इत्यादीची माहितीसुद्धा उपलब्ध झाली. विविध राजवंश, त्यांचे परस्परांमधील संबंध, शिष्टाचार यांच्या अभ्यासासाठीसुद्धा या नियतकालिकातील लेखांचा उपयोग झाला. खरे तर काळाच्या पडद्यामागे दडून बसलेल्या, गाडल्या गेलेल्या प्राचीन भारतीय इतिहासाचे पुनरुत्थानच या निमित्ताने झाले. इतिहासाचे भान हे आपल्या मातृभूमीशी नाते अधिक घट्ट करण्यास कारणीभूत ठरतेच, तसेच आपल्या अभ्युदयाची दिशा निश्‍चित करते. जेम्स बर्जेस यांनी केलेल्या कार्याचे महत्त्व अनन्य आहे.

     खविश्रिसिू क्षेत्रामध्ये इतके मोलाचे योगदान देणार्‍या जेम्स बर्जेस यांनी निरलसपणे आणि अखंडपणे या कार्यात स्वत:ला वाहून घेतले होते. असामान्य आत्मविश्‍वास, झोकून देण्याची वृत्ती आणि मन:शक्ती यांच्या बळावर जेम्स बर्जेस यांनी आश्‍चर्य वाटावे इतके कार्य केले. विविध संस्थांनी त्यांना मानद पदव्या देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच जागतिक स्तरावरील अनेक संस्थांची गौरवपदे त्यांनी भूषवली. उदाहरणार्थ रॉयल सोसायटी ऑफ एडींबरोचे ते मानद सदस्य होते, तर इंपिरियल रशियन आर्किऑलॉजिकल सोसायटी, अमेरिकन ओरिएंटल सोसायटी, रॉयल फिलॉसॉफीकल सोसायटी ऑफ ग्लासगो इत्यादींचे सभासदत्व त्यांनी भूषवले.

     आयुष्याच्या उत्तरार्धात हृदयविकाराने त्यांना ग्रसले, परंतु तरीसुद्धा त्यांचा उत्साह कमी झाला नव्हता. पुरातत्त्व क्षेत्रात काम करणार्‍या, धडपडणार्‍या कैक संस्थांसाठी आणि लोकांसाठी त्यांनी मदतीचा हात पुढे केला. पुढील पिढीतील उत्सुक अभ्यासकांना स्वत:च्या अनुभवसंपन्नतेचा आणि ज्ञानाचा फायदा व्हावा, यासाठी ते स्वत:च्या प्रकृतीचाही विचार बाजूला ठेवत असत. खरोखरच, कामावरील त्यांची निष्ठा, अथक प्रयत्नांची शिकस्त, कार्य तडीस नेण्याची जिद्द आणि तळमळ वाखाणण्याजोगी आहे. ज्ञानाच्या या अगाध सागराने स्वत:चे जीवन तर समृद्ध केलेच, तसेच आपल्या कामाने भारतीयांची मनेही जिंकली.

डॉ. सीमा सोनटक्के

बर्जेस, जेम्स