दफ्तरी, सी. के.
भारताचे दुसरे अॅटर्नी-जनरल सी. के. दफ्तरी हे विसाव्या शतकातील श्रेष्ठ वकिलांपैकी एक होत. ते १९४६ ते १९५१ या काळात मुंबईचे अॅडव्होकेट-जनरल, १९५१ ते १९६३ या काळात भारताचे पहिले सॉलिसिटर-जनरल आणि १९६३ ते १९६८ या काळात भारताचे अॅटर्नी-जनरल होते.
अॅडव्होकेट-जनरल असताना दफ्तरी यांनी दिल्लीला गांधी खून खटल्यात, तसेच नंतर सिमला येथे पंजाब उच्च न्यायालयात चाललेल्या अपिलात सरकारपक्षाची बाजू मांडली.
अत्यंत चाणाक्ष, मिस्किल आणि हजरजबाबी म्हणून दफ्तरी यांची ख्याती होती.
दफ्तरी, सी. के.