Skip to main content
x

कर्णिक,सुरेश दामोदर

       सुरेश दामोदर कर्णिक यांचा जन्म मुंबई येथे झाला. दि. १८ जानेवारी १९५६ रोजी त्यांना भारतीय वायुसेनेत स्क्कॉड्रन लीडर म्हणून सेवेस सुरुवात केली.  १९७१ च्या पाकिस्तान युद्धात त्यांच्याकडे बॉम्बफेकी विमानांच्या तुकडीचे नेतृत्व होते. या युद्धाच्या काळात त्यांनी पूर्व आणि पश्चिम आघाड्यांवर, दिवसा आणि रात्री झालेल्या अशा दोन्ही प्रकारच्या, एकूण सहा अत्यंत कठीण व महत्वाच्या मोहिमांमध्ये भाग घेतला. त्यांमध्ये शत्रूच्या विमानतळांवर दिवसा व रात्रीचे हल्ले करणे अशा प्रकारच्या कामांचा समावेश होता. कर्णिक यांनी या युद्धादरम्यान नेतृत्व, धाडस या गुणांचे व व्यावसायिक कौशल्याचे उच्चतम प्रदर्शन घडविले.त्यांना दि. १८ डिसेंबर १९७१ रोजी ‘वीरचक्र’ देऊन सन्मानित करण्यात आले.

-संपादित

कर्णिक,सुरेश दामोदर