Skip to main content
x

क्षीरसागर, एस. जी.

             .जी. क्षीरसागर यांचा जन्म नाशिक येथे झाला. त्यांनी जी.बी.व्ही.सी. पदवी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातून प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी चिपळूण येथील डोंगराळ भागात आणि नवापूर येथील आदिवासी भागात पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले. ते १९४६मध्ये मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात अध्यापक झाले. त्यांनी १९५७-१९५८ या दोन वर्षांत अमेरिकेतील कॅनसास विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यांची १९५९मध्ये मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून आणि १९७३मध्ये अधिष्ठाता म्हणून नेमणूक झाली. त्यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी संशोधनकार्य आणि विस्तारकार्याच्या विकासासाठी अतुलनीय परिश्रम घेतले.

            डॉ. क्षीरसागर यांच्या अविरत प्रयत्नांमुळे आरे दूध वसाहतीमधील युनिट क्र. २२ महाराष्ट्र शासनाकडून मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाकडे ११ एकराच्या भूखंडासह हस्तांतरित करण्यात आले. त्यामुळे महाविद्यालयाकडे स्वत:च्या नियंत्रणाखालील प्रक्षेत्र असावे ही फार पूर्वीपासूनची गरज पूर्ण झाली. वैरण उत्पादनाचे काम सुरू झाले आणि पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके दाखवणे शक्य झाले. डॉ. क्षीरसागर १९७५मध्ये अधिष्ठाता पदावरून निवृत्त झाले.

- संपादित

क्षीरसागर, एस. जी.