Skip to main content
x

शेख, बशीर हसन

     परेशन रक्षक या मोहिमेमध्ये बशीर शेख हे १९ सप्टेंबर १९९३ रोजी तिसर्‍या राष्ट्रीय रायफल बटालीयनचे नेतृत्व करीत होते. त्यांच्या तुकडीवर काश्मीरमधील अचबल - दकसुम या रस्त्यावर पहारा ठेवण्याचे काम सोपवण्यात आले होते.

     या रस्त्यावर ही तुकडी गस्त घालत असताना झालंगम येथे आल्यावर अचानक अतिरेक्यांनी त्यांच्यावर हल्ला केला व गोळीबार सुरू केला. तेव्हा एक अतिरेकी जवळून गोळीबार करत असताना शेख बशीर हसन यांनी त्याच्या दिशेने धाव घेतली व त्याच्यावर हल्ला करून त्यास यमसदनी पाठविले. परंतु त्याच वेळेला दुसर्‍या अतिरेक्यानेे त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात जबर जखमी होऊन सुभेदार हसन वीरगतीस प्राप्त झाले. मात्र त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अन्य जवानांनी आणखी तीन अतिरेक्यांना ठार मारले. सुभेदार हसन यांच्या साहस व पराक्रमाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना मरणोत्तर शौर्यचक्र प्रदान केले.

- रूपाली गोवंडे

शेख, बशीर हसन