Skip to main content
x

सबनीस, रघुनाथ दामोदर

सबनीस वसंत

       साहित्यकृतींवर आधारित चित्रपट, तसेच नाटके यांची समृद्ध परंपरा मराठीमध्ये आढळते. वसंत सबनीस हे अशाच लेखकांपैकी एक महत्त्वाचे नाव. वसंत सबनीस यांनी आपल्या कारकिर्दीत साहित्यक्षेत्रात नाव मिळवत असतानाच चित्रपटसृष्टीत आणि नाट्यसृष्टीतही ठसा उमटवला. विशेषत: दर्जेदार विनोद हे सबनीसांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य होते.

      ‘सोंगाड्या’, ‘एकटा जीव सदाशिव’, ‘हऱ्या नाऱ्या झिंदाबाद’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘खिचडी’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘गंमत जंमत’ अशा महोत्सवी चित्रपटांचे लेखनकर्तृत्व सबनीसांचे होते. हे सर्व चित्रपट विनोदी होते. ते सर्व यशस्वी ठरले. त्यांच्या चित्रपटांतून ग्रामीण बाजाचे उत्तम लेखन आढळते.

      ‘सौजन्याची ऐशीतैशी’, ‘गेला माधव कुणीकडे’, ‘सोबती’, ‘घरोघरी हीच बोंब’, ‘आप्पाजींची सेक्रेटरी’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘कार्टी श्रीदेवी’, ‘निळवंती’, ‘म्हैस येता माझ्या घरा’, ‘मेजर चंद्रकांत’, ‘हेही दिवस जातील’, ‘घरमालक’, ‘पतंग’ ही त्यांची गाजलेली नाटके. वगनाट्य ही त्यांची वैशिष्ट्ये होती. मूळचे कोकणातील पुसाळ गावाचे असल्याने त्यांच्या भाषेवर खास कोकणी संस्कार होते. ‘खणखणपूरचा राजा’ या वगनाट्यापासून त्यांची दादा कोंडके यांच्याशी जोडी जमली.‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाच्या हजारो प्रयोगांतून ती अधिक घट्ट झाली. सबनीस यांचे १२ कथासंग्रह प्रसिद्ध झाले.

- जयश्री बोकील

सबनीस, रघुनाथ दामोदर