Skip to main content
x

चव्हाण, अंकुश महादेव

     अंकुश महादेव चव्हाण यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील नरडवे या छोट्याश्या गावात झाला. दि. ४ नोव्हेंबर १९६२ रोजी त्यांनी सैन्यदलात प्रवेश केला. एकोणिसाव्या मराठा लाइट इन्फन्ट्रीत त्यांची नेमणूक झाली. १९७१ च्या बांगलादेश युद्धात एका चकमकीत नाईक अंकुश चव्हाण यांच्यावर त्यांच्या तुकडीच्या डाव्या बगलेकडील फळीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी होती. या चकमकीदरम्यान त्यांच्या तुकडीतील हलकी मशीनगन चालवणारे दोन्ही जवान गंभीर जखमी झाले. अशा प्रसंगी चव्हाण यांनी स्वयंचलित मशीनगन ताब्यात घेतली व लक्ष्य पूर्ण करेपर्यंत मारा चालू ठेवला. चकमकीच्या दुसऱ्या दिवशीही त्यांच्या माऱ्याने शत्रूचे अतोनात नुकसान झाले. या युद्धादरम्यान चव्हाण यांनी दाखवलेल्या उच्चतम शौर्य, निष्ठा आणि जिद्द या गुणांसाठी दि. १३ डिसेंबर १९७१ रोजी ‘वीरचक्र’ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
-संपादित

चव्हाण, अंकुश महादेव