Skip to main content
x

देऊस्कर, अरुण लक्ष्मण

       अरुण लक्ष्मण देऊस्कर यांचा जन्म अकोला येथे झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर दि. २५ डिसेंबर १९६४ रोजी ते भारतीय वायुसेनेत दाखल झाले. १९७१ च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात फ्लाइट लेफ्टनंट देऊस्कर भारतीय बॉम्बफेकी विमानाचे चालक (पायलट) होते. शत्रूच्या हद्दीतील हवाई तळांवरआतवर जाऊन त्यांनी हल्ला केला.  त्याच वेळी जमिनीवरून विमानविरोधी गोळीबार होत असतानाही त्यांनी पाकिस्तानची दोन विमाने नष्ट केली. याच हल्ल्यात त्यांनी शत्रूच्या हवाई तळांवर हल्ला करून तेथील साधनसामग्रीही उध्वस्त केली.
       या हल्ल्यावरून परतत असताना मात्र त्यांना शत्रूच्या विमानहल्ल्याला तोंड द्यावे लागले. या हल्ल्यात त्यांचे विमान अपघातग्रस्त झाले, तरीही सुरक्षितपणे त्यांनी ते विमानतळावर परत आणले. या युद्धात त्यांनी दाखवलेले धैर्य व उत्तम व्यावसायिक कौशल्य यांबद्दल त्यांना ‘वीरचक्र’ प्रदान करण्यात आले.
-संपादित

देऊस्कर, अरुण लक्ष्मण