Skip to main content
x

गणपती, नंदेपांडा अप्पाचू

           नंदेपांडा अप्पाचू गणपती यांचा जन्म महाराष्ट्रातील सोमरपेट येथे झाला. आता ते कर्नाटकात बंगळूरू येथे स्थायिक झाले आहेत. लेफ्टनंट कर्नल एम.ए. गणपती हे त्यांचे वडील होते. दि. १६ मे १९६५ रोजी ते वायुसेनेत दाखल झाले.  दि. २२ नोव्हेंबर १९७१ रोजी २ वाजून ५० मिनिटांनी भारताच्या हद्दीत घुसलेल्या छार पाकिस्तानी विमानांना पडण्याचे आदेश त्यांना मिळाले. त्या वेळी एन.ए. गणपती चार नॅटविमानांच्या तुकडींपैकी  क्रमांक तीनच्या विमानाचे चालन करत होते.
       गणपती यांनी आपल्या युद्धकौशल्याचा पुरेपूर उपयोग करत अश्तृच्या एका सेबर जेटला जमीनदोस्त केले. त्यांच्या या कर्तुत्वामुळे त्यांना दि. २२ नोव्हेंबर १९७१ रोजी ‘वीरचक्र’ देऊन गौरविण्यात आले.

-संपादित

गणपती, नंदेपांडा अप्पाचू