Skip to main content
x

जवळगे, उत्तम भानुदास

            त्तम भानुदास जवळगे यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील मंगरूळ या अगावी झाला. १९ डिसेंबर १९६२ रोजी हवाई दलात प्रवेश केल्यावर पाचशे एकाव्या हवाई संरक्षण तुकडीमध्ये त्यांशी नियुक्ती करण्यात आली. १९७१ च्या पाकिस्तान युद्धात छांब विभागातील पायदळ मुख्यालयाच्या संरक्षणासाठी तैनात केलेल्या हवाई संरक्षण यंत्रणेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली.
       ८ डिसेंबर १९७१ रोजी हवालदार उत्तम जवळगे यांनी अचूक मारा करून मुख्यालयावर हल्ला करणाऱ्या चारांपैकी एक पाकिस्तानी सेबर जेट विमान पाडण्यात यश मिळविले. त्यांच्या या उच्चतम धाडस व कार्य कौशल्याबद्दल ८ डिसेंबर १९७१ रोजी ‘वीरचक्र’ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
-संपादित

जवळगे, उत्तम भानुदास