Skip to main content
x

जामसजी, परवेझ रुस्तम

        परवेझ रुस्तम जामसजी यांचा जन्म अहमदनगर येथे झाला. देवळाली येथील बार्न्स विद्यालय, तसेच पुण्यातील मॉडेल विद्यालयात त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. पुण्यातील नेस वाडिया महाविद्यालयातून त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केळे. दि. १६ ऑक्टोबर १९६५ रोजी त्यांनी वायुसेनेत प्रवेश केला. १९७१ मधल्या पाकिस्तानविरुद्धच्या कारवाईत ते हेलिकॉप्टरच्या ताफ्यात कार्यरत होते. फ्लाइट लेफ्टनंट जामसजी ज्या हेलिकॉप्टरचे चालक होते, त्यावर शत्रूकडून दोन वेळा हल्ला झाला. मशीनगन्स आणि तोफांच्या मारांतूनही आपले विमान वाचवून त्यांनी सोपवलेली कामगिरी पूर्ण केली. आणि हेलिकॉप्टर सुखरूपपणे तळावर आणले.
      अशाच एका कारवाईत त्यांच्या हेलिकॉप्टरचे इंजीन शत्रूच्या हद्दीतच बंद पडले. तरीही मोठ्या कौशल्याने ते हेलिकॉप्टर त्यांनी सुरक्षितपणे परत आपल्या हद्दीत आणले. या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना दि. १६ डिसेंबर १९७१ रोजी ‘वीरचक्र’ प्रदान करण्यात आले. पुढे ‘स्क्कॉड्रन लीडर’ या पदावरही त्यांना बढती मिळाली.
-संपादित

जामसजी, परवेझ रुस्तम