Skip to main content
x

काजळे, मुकुंद डी

        प्रा. मुकुंद काजळे यांचे शिक्षण पुणे येथे झाले. त्यांनी १९७२ मध्ये वनस्पती-विज्ञान विषयात एम.एस्सी. पदवी संपादन केली व त्यानंतर १९७९ मध्ये डेक्कन कॉलेजातून प्रा.शरद राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. प्राप्त केली. त्यांच्या प्रबंधाचा विषय घोड नदीचा जैवपुरातत्त्वीय अभ्यासअसा होता.

प्रा.काजळे यांनी डेक्कन कॉलेजमध्ये पुरातत्त्व विभागात संशोधनाचे व अध्यापनाचे कार्य दीर्घ काळ केले. त्यांनी नेवासा, दायमाबाद, इनामगाव, वाळकी, कवठे, आपेगाव व तुळजापूर गढी या ताम्रपाषाणयुगीन पुरातत्त्वीय स्थळांच्या उत्खननात मिळालेल्या वनस्पतींच्या अवशेषांचा अभ्यास केला. तसेच त्यांनी नैकुंड, भागीमोहरी व अडम अशा अनेक महापाषाणयुगीन-ऐतिहासिक पुरातत्त्वीय स्थळांवर प्राप्त वनस्पती-अवशेषांवर संशोधन करून प्राचीन महाराष्ट्रातील शेतीच्या विकासावर प्रकाश टाकण्याचे महत्त्वाचे कार्य केले.

पुण्यातील डेक्कन कॉलेजात पुरातत्त्व विभागात वेगवेगळ्या विषयांच्या संशोधन प्रयोगशाळांमधील पुरातत्त्वीय वनस्पती-विज्ञान (Archeobotany) या विषयाची प्रयोगशाळा निर्माण करण्याचे श्रेय प्रा.काजळे यांना दिले जाते. पुरातत्त्व विभागप्रमुख या पदावरून प्रा. काजळे २०१० मध्ये सेवानिवृत्त झाले. तथापि सेवानिवृत्तीनंतरही पुरावनस्पतिविज्ञान, पुरापरागविज्ञान व पुरापर्यावरण या विषयांमध्ये त्यांचे संशोधन सातत्याने सुरू आहे.

डॉ. प्रमोद जोगळेकर

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].