Skip to main content
x

किरतकुडे, आबा कोंडिबा

बा कोंडिबा किरतकुडे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील भोसरे येथे झाला. दि. १६ डिसेंबर १९४३ रोजी किरतकुडे महार रेजिमेंटमध्ये दाखल झाले. दि. २३ जून १९४८ हा दिवस त्यांच्या कारकिर्दीत महत्वपूर्ण ठरला. या दिवशी शत्रूने मशीनगनमधूनगोळीबार आणि बॉम्बफेक करण्यास सुरुवात केली. किरतकुडे यांनी शत्रूला जोरदार गोळीबारानेच प्रत्युतर दिले. त्यांच्या गोळीबारामुळे शत्रूचे ११ सैनिक ठार झाले.

पुन्हा दि. २९ जून १९४८ रोजी शत्रूने आपल्या सैन्यावर जोरदार हल्ला केला. या वेळी प्रतिकूलपरिस्थितीवर मात करीत लान्सनाईक किरतकुडे यांनी लढा दिला व शत्रूला जोरदार प्रत्युतर दिले. त्यानंतर काही क्षणांतच शत्रूसैन्याकडून होणारा गोळीबार थंडावला. ते पाहून किरतकुडे यांनी दुसऱ्या बंकरकडे धाव घेतली. परंतु, शत्रूकडून झालेल्या गोळीबारात दुर्दैवाने ते जखमी झाले. अशा जखमी अवस्थेतही  मागे फिरण्यास त्यांनी नकार दिला आणि शत्रूवर गोळीबार करणे सुरूच ठेवले. किरतकुडे यांनी शत्रूशी लढताना दाखवलेले कौशल्य, एकाग्रता आणि साहसाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

-संपादित

किरतकुडे, आबा कोंडिबा