Skip to main content
x

फडतरे, जी. के.

      जी.के. फडतरे यांनी पुणे कृषी महाविद्यालयाच्या कृषि-विस्तार विभागातून पदवी प्राप्त केली. तसेच कॉरनेल विद्यापीठातून एम.एस.ची पदवी मिळवली. महाविद्यालयात १९५४मध्ये कृषि-विस्तार विभाग स्वतंत्र केल्यानंतर पहिले जिल्हा कृषि-अधिकारी होण्याचा मान फडतरे यांना मिळाला. पुढे त्यांनी कृषि-विस्तार विभागाचे प्रमुख प्राध्यापक म्हणूनही काम पाहिले. नव्याने स्थापन झालेल्या कृषि-विस्तार विभागाने यु.एस.ए. येथील टी.सी.एम. कार्यक्रमासाठी मुंबई शासनाने जी.के. फडतरे आणि डॉ. पी.व्ही. साळवी यांची निवड करून, त्यांच्यावर विभागाच्या अंतर्गत विकासाची जबाबदारी सोपवली, त्या वेळी त्यांच्यासोबत विस्तारशिक्षण आणि ग्रामीण समाजशास्त्र या विषयाचे तज्ज्ञ असणारे डॉ. ई.आर. हॉस्किन आणि डॉ. आर.सी. हिल हे दोन अमेरिकन तज्ज्ञ काम करत होते. त्यांनी फडतरे व डॉ. साळवी यांना विभागातील दैनंदिन कामकाज बारकाईने शिकवले.

- संपादित

फडतरे, जी. के.