Skip to main content
x

सामंत, मोहन नारायण

    मोहन सामंत हे बांगलादेशच्या मोंगला आणि खुलना बंदरावर अत्यंत धाडसी आणि यशस्वी हल्ला करणार्‍या चार युद्धनौकांच्या समूहाचे वरिष्ठ अधिकारी होते. अत्यंत धोकादायक आणि अनोळखी रस्त्याने आपल्या युद्धनौकांनी हल्ला चढवून मोंगला बंदरातील शत्रूला जखडून टाकले आणि शत्रू सैन्याचे जबरदस्त नुकसान केले. खुलनामध्ये अत्यंत चुरशीची लढाई झाली आणि भारतीय युद्धनौकांवर सतत हवाई हल्ले होत राहिले. मुक्ती वाहिनीच्या दोन बोटी बुडविल्या गेल्या. कमांडर सामंतांनी आपल्या जीवाची काळजी न करता हल्ल्यातून वाचलेल्या बहुसंख्य लोकांना सुरक्षितपणे आणले आणि शत्रूवर निकराचे हल्ले चढवून त्याचे प्रचंड नुकसान केले. संपूर्ण युद्धकाळात मोहन नारायण सामंत यांनी दाखविलेल्या अतुल शौर्य, कर्तव्यनिष्ठा व नेतृत्वाबद्दल त्यांना महावीरचक्र प्रदान केले गेले.

- रूपाली गोवंडे

सामंत, मोहन नारायण