Skip to main content
x

आळतेकर, अनंत सदाशिव

    अनंत सदाशिव आळतेकर इतिहासाचे सुप्रसिद्ध अभ्यासक, संशोधक व लेखक होते. ते एम.ए.,डी.लिट होते. ते हिंदू विश्वविद्यालय बनारस येथे प्राचीन हिंदी इतिहास व संस्कृत यांचे ‘मणींद्रचंद्र नंदी’ प्राध्यापक होते. त्यांनी इंग्रजीत बरेच ग्रंथ लिहिले आहेत आणि ते उच्च दर्जाचे समजले जातात. त्यांनी ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’करिता लिहिलेला ‘राष्ट्रकूट’ हा ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहे. त्यांचे हे मराठी ग्रंथ प्रसिद्ध आहेत. - १. प्राचीन शिक्षण पद्धती २. राष्ट्रकूट राजे व त्यांचा काळ ३. शिलाहार यांचे प्रसिद्ध झालेले इंग्रजी ग्रंथ : १) History of Important Towns and Cities in Gujrat and Kathiawar,

२) A History of the Village Communities in Western India, ३) Education in Ancient India,

४) A New Gupta King, ५) Rashtrakutas and their Times (त्यांना या प्रबंधामुळे हिंदू विश्वविद्यालयाची डी.लिट. पदवी मिळाली. राष्ट्रकूटांच्या सत्तेखाली असणार्‍या महाराष्ट्राचा इतिहास यात देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. (१९३४)

संपादित

आळतेकर, अनंत सदाशिव