Skip to main content
x

बापुदेवशास्त्री, नृसिंह सीताराम

    बापुदेवशास्त्री हे अहमदनगर जिल्ह्यातील टोके येथील राहणारे ऋग्वेदी चित्पावन ब्राह्मण होते. त्यांच्या पित्याचे नाव सीताराम, तर मातेचे नाव सत्यभामा होते. नागपूर येथे प्राथमिक शिक्षण घेऊन त्यांनी धुंडिराज नावाच्या कान्यकुब्ज ब्राह्मणाकडे भास्करचार्यांच्या लीलावतीचे व बीजगणिताचे अध्ययन केले. सिहूर येथे संस्कृत पाठशाळेवर त्यांची नेमणूक झाली असता त्यांनी सेवाराम यांच्याकडे रेखागणिताचे अध्ययन केले. पुढे १८४१मध्ये काशीतील संस्कृत पाठशाळेत रेखागणित शिकवण्याकरिता त्यांची नेमणूक झाली. तेव्हापासून शेवटपर्यंत ते काशी येथे होते व त्यांची मानमान्यता व हुद्दा सारखा वाढत गेला. ते रॉयल एशियाटिक सोसायटी, ग्रेट ब्रिटनचे व बंगालचे सन्माननीय सभासद, कलकत्ता व अलाहाबाद विश्‍वविद्यालयाचे फेलो, महामहोपाध्याय, सी.आय.ई. इत्यादी पदव्यांनी विभूषित होते. एकदा चंद्रग्रहण बरोबर वर्तवल्याबद्दल जम्मूच्या राजाने यांना एक हजार रुपये बक्षीस दिले.

त्यांनी आपल्या विषयावर संस्कृत, हिंदी व इंग्रजीमध्ये अनेक ग्रंथ केले आहेत.

संपादित

बापुदेवशास्त्री, नृसिंह सीताराम