Skip to main content
x

पाटील, हरिश्चंद्र जी.

        रिश्चंद्र जी. पाटील हे महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. त्यांनी २९ मार्च १९६८ ते १५ नोव्हेंबर १९७१ या सुमारे पावणेचार वर्षांच्या कार्यकालात विद्यापीठाची अनेक महत्त्वाची कामे केली. त्यांनी कुलगुरूंचे कार्यालय राहुरी येथे हलवले. भूमी संपादन आणि इमारतींची बांधकामे त्यांच्याच प्रयत्नामुळे आणि पाठपुराव्यामुळे पूर्ण झाली. त्यांनी १९३१मध्ये पुणे येथील कृषी महाविद्यालयातून बी.एजी.(कृषी) पदवी प्राप्त केली. नंतर ते गोखले शिक्षण संस्थेत रुजू झाले. ग्रामीण जनतेमध्ये कृषीविषयक शास्त्रीय शिक्षणाचा प्रसार व्हावा हे ध्येय समोर ठेवून त्यांनी या संस्थेत काम केले. हरिश्‍चंद्र पाटील हे ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथील सुप्रसिद्ध कृषी प्रशालेचे संस्थापक होते. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी लोकांनी जमिनीची मशागत, पेरणी, लागवड पद्धत, औषधी वृक्षांची जोपासना इत्यादी अनेक क्षेत्रांत शास्त्रीय ज्ञान आणि तंत्रज्ञान अंगीकारावे यासाठी या संस्थेने यशस्वी प्रयत्न केले. भारतामध्ये ‘जपानी पद्धतीने भाताची लागवड पद्धत’ सुरू करणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते.

        दहापेक्षा जास्त वर्षांच्या कालावधीसाठी केंद्रीय योजना आयोगाच्या कृषी समितीचे ते सदस्य होते. भारत सरकारने १९६७मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना गौरवले.

- संपादित

पाटील, हरिश्चंद्र जी.