Skip to main content
x

कविना, बहादूर नरीमन

         बहादूर नरीमन कविना यांचा जन्म भुसावळ येथे झाला. नाशिकमधील बॉइज टी विद्यालयातूनशालेय शिक्षण पूर्ण करून त्यांनी मुंबईतील जयहिंद, तसेच के.सी. महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. दि. जुलै १९६० रोजी ते भारतीय नौसेनेत दाखल झाले. १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान घनघोर युद्ध झाले. भारतीय सेनेन त्यात अतुलनीय शौर्याचे प्रदर्शन केले. पाकिस्तानबरोबरच्या युद्धामध्ये त्यांनी कराची बंदरावर हल्ला करणाऱ्या नौसेनेच्या ताफ्यातील एका लढाऊ जहाजाचे नेतृत्व केले. शत्रूच्या संरक्षक फळीकडून होणारा मारा व हवाई हल्ल्याच्या धोका यांची पर्वा न करता त्यांनी शत्रूवर निकराचा हल्ला चढवला.
        बहादूर नरीमन कविना यांच्या निधड्या नेतृत्वामुळेच पाकिस्तानी नौसेनेला जबरदस्त दणका देणे भारतीय नौसेनेला शक्य झाले. त्यांच्या, तसेच इतर नौसेना तुकड्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे शत्रूच्या जहाजांचा ताफा बंदरातच नष्ट करणे. नौसेनेस शक्य झाले. या युद्धात त्यांनी दाखविलेले असामान्य धाडस, निष्ठा व नेतृत्वगुणांसाठी दि. १८ डिसेंबर १९७१ रोजी त्यांना ‘वीरचक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
-संपादित

कविना, बहादूर नरीमन