Skip to main content
x

त्रिहोन, मुरलीलाल महेशदास

      मुरलीलाल  महेशदास त्रिहोन यांचा जन्म गुजरातमधील सादुल्लाहपूर येथे झाला. पुण्यातील वाडिया महाविद्यालातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर दि. १४ ऑक्टोबर १९५३ रोजी ते वायुसेनेत दाखल झाले. १९७१ च्या पाकविरुद्धच्या युद्धात विंग कमांडर मुरलीलाल त्रिहोन यांनी पश्चिम विभागामध्ये लढाऊ बॉम्बफेकी विमानांच्या तुकडीचे नेतृत्व केले. त्यांनी अनेक मोहिमांमध्ये भाग घेऊन शत्रुपक्षाचे अनेक रणगाडे नष्ट केले. त्यांच्या तुकडीचे शत्रूच्या प्रदेशाची बारकाईने  टेहळणी करून शत्रूसैन्याचे नियोजन, हालचाली यांची निश्चित माहिती आणली. या महत्वपूर्ण कामगिरीमुळे युद्धकाळात मोहिमांचे नियोजन आणि अंमलबजावणीचे काम योग्य प्रकारे झाले. १९७१ च्या संपूर्ण युद्धकाळात विंग कमांडर त्रिहोन यांनी शौर्य गाजवित कौशल्यपूर्ण कामगिरी केली.
-संपादित

त्रिहोन, मुरलीलाल महेशदास