Skip to main content
x

ठाकूर, राजाराम दत्तात्रेय

राजाराम दत्तात्रेय ठाकूर यांचा जन्म रत्नागिरी येथे झाला. नवयुग फिल्म कंपनीत र.शं. जुन्नरकर यांच्या हाताखाली संकलक म्हणून राजा ठाकूर काम पाहू लागले. जुन्नरकर नवयुग सोडून गेल्यावर राजा ठाकूर यांनी नवयुगच्या क्या तराना’, ‘पन्ना’, ‘शिकायतया तीन चित्रपटांचे स्वतंत्रपणे संकलन केले. त्यानंतर ठाकूर यांनी राजा परांजपे यांना बलिदान’ (१९४८) या चित्रपटासाठी दिग्दर्शन साहाय्य केले व संकलनही केले. पुढे राजा परांजपे यांच्या गाजलेल्या जिवाचा सखा’, ‘लाखाची गोष्ट’, ‘पेडगावचे शहाणेया चित्रपटांचे संकलनही राजा ठाकूर यांनीच केले. राजा परांजपे व ग.दि. माडगूळकर यांनी पुण्यात नवचित्रही चित्रपट संस्था स्थापन केली. बोलविता धनी’ (१९५२) हा त्यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट. त्यानंतर त्यांनी रेशमाच्या गाठीहा चित्रपट दिग्दर्शित केला.

राजा ठाकूर यांनी १९५४ च्या सुमारास स्वत:ची चित्रपटसंस्था स्थापन केली. त्यांनी १९५५ मध्ये मी तुळस तुझ्या अंगणीया चित्रपटाची निर्मिती केली. प्रेक्षक व समीक्षक, दोघांच्याही पसंतीला उतरलेल्या या चित्रपटासाठी राजा ठाकूर यांना राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट प्रादेशिक चित्रपटासाठीचा रजतकमलहा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतरच्या उतावळा नारदमध्ये ठाकूर यांनी हिंदीतील प्रख्यात विनोदी नट भगवान याला मराठीत प्रथमच संधी दिली. चिमणराव व गुंड्याभाऊ या चि.वि. जोशींच्या मानसपुत्रांवर आधारित विनोदी चित्रपट घरचं झालं थोडं’ (१९५७) याची निर्मिती केली. यात दामूअण्णा मालवणकर व विष्णुपंत जोग यांच्या भूमिका होत्या. त्यांचा रंगल्या रात्री अशाहा चित्रपट १९६२ मध्ये प्रदर्शित झाला. अत्यंत यशस्वी ठरलेल्या या चित्रपटातून जगदीश खेबुडकर यांचे गीतकार म्हणून चित्रपटसृष्टीत आगमन झाले. या चित्रपटालाही रजतकमलया पुरस्काराने गौरवले. गजगौरीहा प्रभात फिल्मचा शेवटचा चित्रपट राजाभाऊंनी दिग्दर्शित केला होता. यानंतर त्यांनी राजमान्य राजश्री’, ‘पुत्र व्हावा ऐसा’, ‘पाहू रे किती वाट’, ‘एकटी’, ‘मुंबईचा जावईयासारखे मराठी चित्रपट रसिकांना दिले. त्यातील १९६८ मध्ये आलेल्या एकटीया चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय स्तरावर रजतकमलदेऊन सन्मानित करण्यात आले.

ठाकूर यांनी हिंदीतील सुप्रसिद्ध संगीतकार सी.रामचंद्र यांना धनंजयया चित्रपटात नायकाच्या भूमिकेत संधी दिली. त्यांनतर त्यांनी बिरबल माय ब्रदरया इंग्रजी चित्रपटाची निर्मिती केली. तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करून १९७५ मध्ये जख्मीया यशस्वी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. हा चित्रपट मुंबईत ४० आठवडे एकाच चित्रपटगृहात चालला. यानंतर रईसजादाया चित्रपटाच्या निर्मितीदरम्यानच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.

- द. भा. सामंत

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].