Skip to main content
x

चोप्रा, मनमोहन चेतराम

         नमोहन चेतराम चोप्रा यांचा जन्म जम्मू आणि काश्मीर राज्यातील जम्मू तावी येथे झाला. त्यांचे वडील चेतराम चोप्रा हे पुढे पुण्यास येऊन स्थायिक झाले. दि. २१ डिसेंबर १९४७ पासून त्यांनी भूसेनेतील सातव्या लाइट कॅव्हॅलरीमध्ये सेवेस सुरुवात केली.  दि. १९ सप्टेंबर १९६५ रोजी छाथनवालावर हल्ला करणाऱ्या तुकडीमध्ये त्यांचा समावेश होता. त्यांच्या तुकडीने तोफखान्याच्या मदतीने छाथनवालावर हल्ला चढवला. त्या वेळी आपले काही रांगडे, ज्यांमध्ये मेजर मनमोहन चोप्रांच्या रणगाड्याचा समावेश होता, एका फसव्या भूभागात अडकून पडले होते.
   शत्रूने संधीचा फायदा घेत या रणगाड्यांवर तोफखान्याच्या साहाय्याने जोरदार हल्ला चढवला. मेजर चोप्रा यांनी न डगमगता आपली बाजू धरून ठेवली व तीन रणगाड्यांना बाहेर काढण्यात यश मिळवले. हे करत असताना शत्रूच्या एका तोफगोळ्याने त्यांच्या रणगाड्याचा वेध गेटला आणि ते स्वतः गंभीर जखमी झाले. या जखमांमुळेच नंतर त्यांना वीरमरण प्राप्त झाले. मेजर मनमोहन चोप्रा यांनी धाडस, निष्ठा आणि जिद्दीचे सर्वोच्च प्रदर्शन घडविले. या कामगिरीबद्दल त्यांना दि. १९ सप्टेंबर १९६५ रोजी ‘वीरचक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
-संपादित

चोप्रा, मनमोहन चेतराम