Skip to main content
x

प्रधान, अनीष वसंत

            नीष वसंत प्रधान यांचा जन्म संगीतप्रेमी कुटुंबात झाला. त्यांचे वडील पत्रकार आणि लेखक होते. १९४२ च्या भारत छोडोचळवळीत त्यांचा सहभाग होता, तसेच ट्रेड युनियनच्या चळवळीतही त्यांचा सहभाग होता. आई किरण या व्यवसायाने वकील होत्या. त्या लहानपणी संगीत शिकत होत्या. अनीष प्रधान यांच्या भगिनींनीही पाश्चात्त्य संगीताचे शिक्षण घेतले होते.

अनीश प्रधानांनी वयाच्या सहाव्या वर्षापासून संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. वयाच्या नवव्या वर्षापासूनच ते तबल्याचे कार्यक्रम देऊ लागले. लहानपणी दूरदर्शन, तसेच आकाशवाणीवरून त्यांनी कार्यक्रम सादर केले. पुढे संगीत महाभारतीया विद्यापीठातून पाच वर्षे निखिल घोष यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तबलावादनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. दिल्ली, अजराडा, लखनौ, फरुखाबाद या तबलावादनातील घराण्यांच्या शैलींची तालीम त्यांना निखिल घोषांकडून मिळाली.

अनीष प्रधानांनी मॅट्रिकनंतर मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयातून इतिहासहा विषय घेऊन १९८२ साली मुंबई विद्यापीठाची बी.. पदवी प्राप्त केली. पुढे याच विषयात १९८७ मध्ये एम.. केले. महाविद्यालयीन शैक्षणिक काळातच त्यांना दक्षिणा फेलोशिपप्राप्त झाली. त्यांनी २००२ साली वसाहतकालीन स्थितीत मुंबईतील भारतीय संगीताचे बदलते प्रवाह’ ( Chnging Trends in Indian Music in a Colonial Situation: A Case Study of Bombay) या विषयावर प्रबंध सादर करून डॉक्टरेट मिळवली.

अनीष प्रधान हे एकल तबलावादक व उत्तम साथीदार म्हणूनही संगीतक्षेत्रात ख्यातनाम आहेत. आजवर भारतात, तसेच परदेशांतही त्यांच्या एकल तबलावादनाचे कार्यक्रम झाले असून भारतातील प्रसिद्ध गायक-वादकांना त्यांनी तबल्यावर साथसंगत केली आहे. भारतीय आकाशवाणी व दूरदर्शनवरील ते ग्रेड कलाकार आहेत. ‘उत्तर हिंदुस्थानी संगीतातील परिदर्शने’(पर्स्पेक्टिव्हज) ही मालिका ऑस्टे्रलिया ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनवरून सादर करण्यात आली  असून उत्तर हिंदुस्थानी संगीतातील तालपद्धतीवर अनीष प्रधानांनी या मालिकेमधून विशेष प्रकाश टाकला होता.

मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात संगीतकारांची चरित्रे व निबंधहा विषय शिकवण्याकरिता ते

अभ्यागत प्राध्यापक म्हणून जात. न्यू इंग्लंडच्या संगीत विद्यापीठातील विभागात संस्कृतिसंगीतशास्त्र’ (Ethnomusicology) आणि तत्कालस्फूर्तता (Improvisation) या विषयांकरिता निवासी कलाकारम्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्याचबरोबर पिट्सबर्गविद्यापीठातही पाहुणे व्याख्याते म्हणून ते कार्यरत होते. ते २००८-२०१० मध्ये मॅक्वेअर विद्यापीठाच्या (सिडने, ऑस्ट्रेलिया) माध्यम, संगीत आणि संस्कृती अभ्यास(Music and Cultural Studies) या विभागात वरिष्ठ संशोधक म्हणून ते कार्यरत होते.

याशिवाय भारतात आणि भारताबाहेरील अनेक विद्यापीठांतून, संस्थांतून, कार्यशाळांतून ते तबलावादन प्रात्यक्षिके आणि हिंदुस्थानी संगीतातील इतिहास, परंपरा इत्यादी विषय शिकवत असतात.

अनीष प्रधानांनी अनेक संगीत संबंधित विषयांवर लेखन केले आहे, तसेच परिषदांतून प्रबंधही वाचले आहेत. त्यांचे लेख, इंडियन म्युझिकॉलॉजिकल सोसायटीचे प्रबंध, तसेच आयटीसी - संगीत रिसर्च अकॅडमीच्या परिषदांच्या पुस्तकांतूनही प्रकाशित झाले आहेत. तसेच टाइम्स ऑफ इंडिया’, ‘डीएनए’, ‘टाइम आउटइत्यादी प्रकाशनांतूनही त्यांनी लेखन केले आहे.

त्यांची बाजा गाजाही भारतीय संगीतातील वाद्यांची ओळख करून देणारी पुस्तक मालिकाही प्रकाशित होत असून, यातील पहिला भाग २००८ साली प्रकाशित झाला आहे. अनीष प्रधानांनी एकल तबलावादनात, तसेच लघुपट आणि रंगभूमीकरिताही रचना केल्या आहेत. त्यांच्या सुविद्य पत्नी, प्रख्यात गायिका व रचनाकार शुभा मुद्गल यांच्या समवेत त्यांनी नृत्याकरिता व कंठसंगीताकरिताही रचना केल्या आहेत. तसेच भिन्न संस्कृतींमधील संगीत-सहयोगाच्या सादरीकरणातूनही एक रचनाकार आणि प्रस्तुतकर्ता म्हणून त्यांचा सहभाग राहत आला आहे. ‘एशियन फॅन्टसी ऑर्केस्ट्राया संस्थेचे  ते १९९८ पासून सभासद आहेत, तसेच एन्सेम्बल मॉडर्न’ (फ्रँकफर्ट, जर्मनी) करिताही त्यांनी रचना केल्या असून त्यांच्या सादरीकरणातही प्रधानांचा सहभाग असतो.  

अनीष प्रधानांनी सुनील शानभाग यांनी दिग्दर्शित केलेल्या तुम्बाराया नाटकाचे संगीत दिग्दर्शन केले असून त्यांना १९९८ चे नाट्यदर्पणपारितोषिक मिळाले आहे. त्यांना भारतीय सरकारची कल्चरल टॅलन्टशिष्यवृत्ती मिळाली होती, तसेच त्यांना आदित्य बिर्ला किरणपुरस्कारही प्राप्त झाला आहे.

अंडरस्कोअर रेकॉर्ड प्रा.लि.चे ते संचालक असून ही एक स्वतंत्र ऑनलाइनकंपनी त्यांनी शुभा मुद्गल यांच्यासह प्रस्थापित केली आहे. या कंपनीने काही ध्वनिसंचही काढले आहेत. डॉ. अशोक रानडे (संचय)  याबरोबरच कौशल्या मंजेश्वर, केसरबाई केरकर यांच्याही ध्वनिचकत्या त्यांनी काढल्या आहेत. ‘तबला-सोलो ट्रॅडिशनआणि तबला-ए कंटिन्युइंग ट्रॅ्डिशनहे त्यांच्या तबलावादनाचे दोन संच अंडरस्कोअर रेकॉर्ड प्रा.लि.तर्फे निघाले आहेत.

बाजा गाजा : एकविसाव्या शतकातील भारतातील संगीतअशा एका उत्सवाचे आयोजनही ते करतात. अनीष प्रधान ह्यांचे वास्तव्य मुंबईत असून ते अनेक प्रकारच्या सांगीतिक कार्यवैशिष्ट्यांत, घटनांत, कार्यक्रमांत, सादरीकरणांत व्यग्र असतात.

माधव इमारते

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].