Skip to main content
x

जुन्नरकर, नितीन गजानन

            पाकिस्तानविरुद्धच्या डिसेंबर १९७१ मधील युद्धात फ्लाईट लेफ्टनंट नितीन जुन्नरकर यांनी आपल्या शौर्याचे दर्शन घडविले. शत्रूच्या ठिकाणांची अचूक माहिती भारतीय सैन्याला मिळणे आवश्यक होते. अशावेळी जुन्नरकर यांनी आपले प्राण संकटात टाकून विमानाने शत्रूच्या ठिकाणांची पाहणी केली. त्यांनी शत्रूच्या ठाण्यांची अनेक छायाचित्रे आणली.
      त्यांनी आणलेल्या माहिती आणि छायाचित्रांमुळे भारतीय सैन्याला शत्रूवर विजय मिळवणे अधिक सोपे गेले. त्यांचे हे योगदान महत्वाचे होते. फ्लाईट लेफ्टनंट नितीन जुन्नरकर यांनी धैर्य, कौशल्य आणि देशसेवेचे दर्शन  घडविले.
-संपादित

जुन्नरकर, नितीन गजानन