Skip to main content
x

करमरकर, रघुनाथ  गोपाळ

              घुनाथ गोपाळ करमरकर यांचा जन्म अलिबाग येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी बी.ए. व एलएल.बी. या पदव्या प्राप्त केल्या; परंतु वकिली व्यवसाय अंगीकारला नाही.

            करमरकर यांनी १९४०मध्ये मुंबईच्या ग्रँट रोड भागात दुग्ध व्यवसाय सुरू केला. जेमतेम दोन वर्षांच्या कालावधीतच म्हणजे १९४२मध्ये त्यांनी गोरेगाव येथे गुरांचे आणि मेंढ्यांचे अशी दोन प्रक्षेत्रे सुरू केली. त्यांनी १९४७मध्ये व्यवसायात प्रगती व विस्तार करून दिंडोशी भागात मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय सुरू केला. त्या वेळी त्यांच्या प्रक्षेत्रावर २५० म्हशी होत्या आणि ते दररोज १२ ते १४ हजार लीटर्स दूध पुरवत होते. ते गरजू व इच्छुक व्यक्तींना दुग्ध व्यवसायाबाबत मार्गदर्शनही करत.

            करमरकर यांची जून १९६३मध्ये भारतीय दुग्धशास्त्र संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. याच वर्षी दुग्ध व्यवसायात त्यांनी साधलेली प्रगती, समाजसेवा आणि नेतृत्वगुण यांमुळे त्यांना रॅमन मॅगसेसे पारितोषिक देऊन गौरवले होते. भारत सरकारने रघुनाथ करमरकर यांना पद्मश्री व पुढे पद्मभूषण हे पुरस्कार देऊन त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण कामाचा प्रसंगोत्पात व यथोचित गौरव केलेला आहे.

            - संपादित

करमरकर, रघुनाथ  गोपाळ