Skip to main content
x

कुलकर्णी, सदानंद कृष्णराव

            दानंद कृष्णराव कुलकर्णी यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांच्या आईचे नाव सरला होते. त्यांचे शिक्षण पुण्यातील भावे शाळेत झाले. १९५२मध्ये ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. मॅट्रिकनंतर त्यांनी बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात प्रवेश घेतला. शाळेपासूनच ते राष्ट्रीय छात्रसेनेत (एन.सी.सी.) होते. त्यांना लहानपणापासूनच सैन्यात जाण्याची आवड होती व त्याला घरच्यांचाही पाठिंबा होता. १९५३मध्ये त्यांनी डेहराडून येथील राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयात प्रवेश घेतला. ती त्यांची पहिली तुकडी होती.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मार्च १९५७मध्ये त्यांनी वायुसेनेत प्रवेश केला. १९५७ ते १९९५ या कालावधीत ते वायुसेनेत कार्यरत होते. भारतीय वायुसेनेच्या सेवेत असताना त्यांनी ४२०० तास उड्डाण केले आहे. त्यांनी १९६५ व १९७१च्या युद्धात भाग घेतला होता.

१९६७ ते १९७१ या कालावधीत त्यांना भारतातर्फे इजिप्तमधील अधिकार्‍यांना व विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पाठविण्यात आले. याच काळात १९६९मध्ये त्यांना वायुसेना पदकदेण्यात आले. १९७९मध्ये त्यांना भारतातर्फे संरक्षण व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी अमेरिकेत पाठविण्यात आले. त्यांना १९९५ साली राष्ट्रपतींच्या हस्ते परमविशिष्ट सेवा पदकदेण्यात आले. कुलकर्णी यांनी १९८१मध्ये चेन्नई (तत्कालीन मद्रास) विद्यापीठातून संरक्षण शास्त्रातील एम.एस्सी. अभ्यासक्रम पूर्ण केला. १९८९मध्ये उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्रया विषयात पीएच.डी पदवी घेतली. त्यांनी मेथड ऑफ इन्स्ट्रक्शन (१९६२), नेव्हिगेशन इन्स्ट्रक्टर कोर्स (१९६२), ज्यूनियर कमांडर कोर्स (१९७१), डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कोर्स (१९७२), अ‍ॅडव्हान्स वर्क स्टडी कोर्स (१९७४), सीनियर डिफेन्स मॅनेजमेंट कोर्स (१९७९)इंटरनॅशनल डिफेन्स मॅनेजमेंट कोर्स (१९७९) असेही अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत.

१९८३ ते १९८४ या काळात ते वायुदलाच्या बेगमपेट तळावर स्टेशन कमांडर म्हणून कार्यरत होते.  सप्टेंबर १९८८ ते १९८९ या काळात चेन्नई (तत्कालीन मद्रास) येथे ते कमांडर म्हणून कार्यरत होते. तसेच नॅशनल डिफेन्स कॉलेजमध्येही ते काही काळ कार्यरत होते. १९९५मध्ये त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते परमविशिष्ट सेवा पदकप्रदान करण्यात आले.

वायुसेनेत असताना त्यांनी इजिप्त, अमेरिकाइंडोनेशिया, केनिया, टांझानिया, जपान, हाँगकाँग, सिंगापूर, थायलंड, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, चीन या देशांना भेटी दिल्या आहेत.वायुसेनेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज येथे संचालक म्हणून

दि.१ फेब्रुवारी १९९५पासून काम केले. काउन्सिल फॉर सिक्युरिटी को-ऑपरेटिव्ह इन आशिया-पॅसिफिक इंडिया कमिटी’ (१९९९-२००४), ‘यशदाच्या संचालक मंडळाचे सभासद (१९९८-२०००), आणि रक्षा प्रबंधन संस्थान व  रक्षा महाविद्यालय या संस्थांचे तेे महासंचालक होते.

त्यांनी संरक्षणशास्त्राचे व्यवस्थापन आणि अर्थसंकल्प यांवर लिखाण केले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सुरक्षा हे त्यांच्या अभ्यासाचे विषय होत.

- सायली अग्निहोत्री

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].