Skip to main content
x

सवाई, पौर्णिमा विजय

               पौर्णिमा विजय सवाई यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील नेर परसोपंत येथे झाला. त्यांचे माहेर व सासर शेतकरी कुटुंबातील आहे. त्यांना शेतीचा गुरुमंत्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतून प्राप्त झाला. त्यांनी विकसित शेतीचे प्रयोग केले आहेत. त्या दृष्टीने त्यांनी ताकरखेड संभू या गावी नवीन तंत्रज्ञानाचे पाठ गिरवले आहेत. त्या शेतीबरोबरच कृषी संलग्न व्यवसायही करतात. त्या शासनाच्या विविध योजनांमधून अर्थसाहाय्य मिळवून रेशीम उद्योग, गांडूळ खतनिर्मिती व दुग्धव्यवसाय हे उपक्रम करतात. भातकुली तालुक्याच्या ग्रामीण क्षेत्रात महिलांना शेतीचे ज्ञान देऊन अनुकरण करण्यास सिद्ध करतात. त्यांनी महिला बचतगटही स्थापन केले आहेत आणि त्या इतर महिलांना कृषी संलग्न व्यवसायात सामील करून घेतात. पौर्णिमा सवाई यांना शेतकरी एकता मंच, वर्धा या संस्थेने कृषिभूषण म्हणून पुरस्कार दिलेला आहे. त्यांना वसंतराव प्रतिष्ठान, पुसद यांनी शेतिनिष्ठ पुरस्कार दिला आहे. तसेच त्यांना महाराष्ट्र शासनाचा जिजामाता कृषिभूषण पुरस्कार २००६-०७मध्ये मिळाला आहे व २००८-०९मध्ये रेशीम संचालनालयाचा लखपती पुरस्कारही मिळाला.

- सोनाली शशांक देशमुख

सवाई, पौर्णिमा विजय