Skip to main content
x

पाटील, विश्वनाथ शामराव

पाटील, विष्णुअण्णा

विश्वनाथ शामराव पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील पद्माळे या गावी झाला. त्यांचे शिक्षण पद्माळे गावीच मॅट्रिकपर्यंत झाले. वडील शामराव हे राजकीय नेते असल्यामुळे विश्वनाथ यांना राजकारण व समाजकारण यांचे बाळकडू मिळाले होते. विश्वनाथ पाटील यांना राजकीय जीवनात खूप धक्काधक्कीचे प्रसंग सहन करावे लागले. परंतु शामराव यांना आपल्या स्वत:च्या जीवनपद्धतीने त्यांना जी शिकवण दिली होती तीही न खचण्याच्या बाण्याचीच होती. विश्वनाथ पाटील यांनी महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रातल्या अनेकविध संस्था आपल्या अध्यक्षपदाखाली कार्यरत ठेवलेल्या होत्या. सहकार क्षेत्रात त्यांना विशेष मान होता. सहकारी कारखानदारीतले एक प्रगल्भ व्यक्तिमत्त्व म्हणून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर अखिल भारतात आणि परदेशात जिथे जिथे सहकारी कारखानदारी उभी आहे तिथे सर्वत्र पाटील यांचा सहकारी कारखानदारीतले तज्ज्ञ म्हणून दबदबा होता.

विश्वनाथ पाटील भारतातील नॅशनल हेवी इंजिनियरिंग को-ऑप लि., हे नवी दिल्लीचे  अध्यक्ष होते. तसेच महाराष्ट्रातल्या राज्य सहकारी बँकेचे सलग पाच वर्षे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मर्यादित मुंबईचे अध्यक्षपद त्यांनी भूषविलेले आहे. नॅशनल को-ऑप युनियन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस असोसिएशन, पुणे या संस्थांचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविलेले आहे. तसेच राजकीय क्षेत्रात महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे सदस्य व महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सदस्य होते.

पाटील यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली वसंतदादा पाटील यांच्या शेतकरी सहकारी साखर कारखाना मर्यादित सांगली व वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेचे अध्यक्षपद भूषविले. तसेच ते शेतकरी शिक्षण मंडळ सांगली व पद्मभूषण वसंतरावदादा पाटील तंत्रविद्या शिक्षण संस्था; बुधगाव या संस्थांचे संस्थापक व सदस्य होते. राजकारण, सहकार व समाजकार्याबरोबर शैक्षणिक कार्यातदेखील ते अग्रस्थानी होते. त्यामध्ये वसंतदादा आयुर्वेदिक वैद्यक महाविद्यालय सांगली, जीवन शिक्षण विद्यालय, सांगली व विश्वनाथ शामराव पाटील सांगलीचे दंतमहाविद्यालय, सांगली या संस्थाचे संस्थापक, अध्यक्ष व सदस्य म्हणून त्यांचे कार्य अलौकिक आहे.

विश्वनाथ पाटील यांनाही राष्ट्रीय, राज्य व जिल्हा स्तरावरील अनेक सामाजिक, सहकार, शैक्षणिक व शासकीय समिती व व्यवस्थापनाचे संस्थापक, सदस्य म्हणून कार्य केलेले आहे. त्यामध्ये नॅशनल फेडरेशन ऑफ. को-ऑप. शुगर फॅक्टरी लि., नवी दिल्ली; इंडियन शुगर इंपोर्ट अॅण्ड एक्स्पोर्ट कार्पोरेशन, नवी दिल्ली; पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी मंडळ, पुणे; यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई; सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक लि., सांगली; जिल्हा नियोजन व विकास मंडळ, सांगली; दि. प्रिमिअर को-ऑप प्रिंटर्स लि., पुणे याशिवाय मा. आप्पासाहेब बिरनाळे ट्रस्ट, सांगली; श्री. वसंतराव बंडुजी पाटील ट्रस्ट, सांगली; वसंतदादा विकास प्रतिष्ठान, सांगली तसेच दंडोबा डोंगर विकास समिती, सांगली अशा एक ना अनेक संस्थांचे सदस्य व मार्गदर्शक म्हणून त्यांचे कार्य अतुलनीय होते. केवळ पद्मभूषण वसंतराव दादांचे वारसदार म्हणूनच नव्हे तर दादांनी निर्माण केलेल्या गौरवशाली परंपरेची वाटचाल अतिशय कुशलतेने, संयमाने व यशस्वीरीत्या चालविण्याचे नेतृत्व त्यांच्याकडे होते.

याशिवाय भारतीय साखर उद्योगाच्या वतीने आयोजित परदेश अभ्यास दौर्यात पाटील सहभागी होते. त्यामध्ये युरोपीय राष्ट्रांमध्ये साखर, रसायने, शेती, फळबागा, दुग्धव्यवसाय यांची पाहणी व अभ्यास त्यांनी केला. तसेच मॉरिशस व अमेरिकेमध्ये शेती, साखर व रसायने इत्यादी विषयासंबंधी अभ्यास करून देशातील कृषी औद्योगिक सहकारीकरणास चालना दिली.

-

- सतीश शिवरूद्र होनराव

पाटील, विश्वनाथ शामराव