Skip to main content
x

साळी, शंकर अण्णाजी

       शंकर अण्णाजी साळी यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे झाला. तेथे शेती खात्यात काम करत असताना योगायोगाने ते पुरातत्त्वीय संशोधनाकडे आले.  १९५० मध्ये त्यांना संगमनेरच्याजवळ प्रवरा नदीच्या काठावरील जोर्वे येथे काही खापराचे तुकडे मिळाले. त्याबद्दल कुतूहल वाटून साळींनी पुण्याला येऊन प्रा. सांकलियांची भेट घेतली. हा क्षण त्यांच्या जीवनाला आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या अतिप्राचीन इतिहासाला कलाटणी देणारा ठरला. या स्थळाचे वेगळेपण लक्षात येताच सांकलियांनी १९५०-१९५१मध्ये जोर्वे येथे उत्खनन केले. तेथे एक नवीन ताम्रपाषाणयुगीन संस्कृती प्रकाशात आली व साळी पुरातत्त्वविद्येकडे आकृष्ट झाले.

      त्या वेळी साळी फक्त मॅट्रिक झालेले होते. परंतु प्रा. सांकलिया व भारतीय पुरातत्त्वीय सर्वेक्षणातील म. न. देशपांडे यांनी प्रोत्साहन दिल्याने साळींनी पुढील शिक्षण घेतले व जळगाव जिल्ह्यातील पाटणे येथील प्रागैतिहासिक कालक्रम या विषयावर त्यांनी १९८१मध्ये पीएच.डी. संपादन केली.

डॉ. प्रमोद जोगळेकर

साळी, शंकर अण्णाजी