कल्याणीवाला, रुस्तुम सोराबजी
रुस्तुम सोराबजी कल्याणीवाला यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे शिक्षण सेंट झेवियर्स शाळा, मुंबई आणि दावर्स कॉलेज ऑफ कॉमर्स, मुंबई येथे झाले. त्यांचा काश्मीर खोऱ्यातील उत्तर विभागातील उड्डाण मोहिमांमध्ये महत्वाचा सहभाग आहे. झोझीला खिंडीजवळच्या उंच टेकड्यांवरील शत्रूच्या चौक्यांवरील हल्ले व अचूक बॉम्बवर्षाव यांमध्ये त्यांनी आदर्श घालून दिला. या हवाई हल्ल्यानंतर जमिनीवर हल्ले सुरु झाले. त्यांच्या या हल्ल्यांमुळे भूसेनेस सहकार्य लाभले. गुमरीजवळच्या एका हल्ल्यामुळे आपल्या सैन्याला द्रासपर्यंत पोहोचणे शक्य झाले. रुस्तुम कल्याणीवाला यांना दि. २० नोव्हेंबर १९५० रोजी ‘वीरचक्र’ प्रदान करण्यात आले.
-संपादित
कल्याणीवाला, रुस्तुम सोराबजी